उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ File Photo
राष्ट्रीय

'ज्ञानवापी खरं तर विश्वनाथ...' : योगी आदित्‍यनाथ यांचे मोठे विधान

गोरखपूर विद्यापीठात नाथपंथावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "आज लोक ज्ञानवापीला दुसऱ्या शब्दात मशीद म्हणतात, पण ज्ञानवापी प्रत्यक्षात 'विश्वनाथ' आहे. नाथ परंपरेने नेहमीच सर्वांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गुरु गोरखनाथ यांनी त्यांच्या काळात राष्ट्रीय एकात्मतेकडे लक्ष वेधले होते. रामचरित मानस समाजाला जोडतो, तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे," असे मत उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी आज (दि.१४) व्‍यक्‍त केले. गोरखपूर विद्यापीठात नाथपंथावर आयोजित चर्चासत्राच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भगवान विश्वनाथांना घेतली आदि शंकराचार्यांची परीक्षा...

यावेळी योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, शंकराचार्यांनी भारताच्या चार कोपऱ्यांमध्ये चार पीठांची स्थापना केली. ते जेव्‍हा काशीला आले तेव्हा भगवान विश्वनाथांना त्यांची परीक्षा घ्यायची होती. त्यांनी पाहिले की, सकाळी आदि शंकराचार्य ब्रह्ममुहूर्तावर गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. अचानक एक व्यक्ती त्‍यांच्‍या समोर येते. यावेळी ते आदि शंकराचार्यांना प्रश्न विचारतात की, तुम्ही कोणाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहात? तुमचे ज्ञान हे भौतिक शरीर पाहत आहे की, ब्रह्माला पाहत आहे? जर ब्रह्म सत्य असेल तर हे ब्रह्म माझ्यामध्येही आहे. हे ब्रह्म जाणून घेतल्यावर ते सत्य नाही. यावर आदि शंकराचार्यांनी विचारले तुम्‍ही कोण आहात? त्यांनी सांगितले की, मी खरा विश्वनाथ आहे ज्याच्यासाठी ते काशीला ज्ञानपव्याच्या ध्यानासाठी आले आहेत. हे ऐकून आदि शंकराचार्यांनी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. आज लोक याला मशीद म्हणतात हे दुर्दैव आहे."

प्रत्येक भाषेचा उगम संस्कृतशी जोडलेला

देशाच्या मोठ्या लोकसंख्येद्वारे ओळखल्या जाणाऱ्या देशाला जोडण्यासाठी एक व्यावहारिक भाषा आहे. हिंदीची उत्पत्ती देववाणी संस्कृतमधून झाली आहे. प्रत्येक भाषेचा उगम संस्कृतशी जोडलेला आहे. आपली भाषा आणि भावना आपल्या नसतील तर प्रगतीवर परिणाम होतो. केंद्र सरकारने मागील दहा वर्षांमध्‍ये प्रत्येक स्तरावर हिंदीचा प्रचार केला. आज त्याचा परिणाम म्हणजे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमही हिंदीत होताना दिसत आहे. आता जेव्हा मुत्सद्दी येतात तेव्हा ते आमच्याशी संवाद साधण्यासाठी हिंदीचा वापर करतात. भारतातील संतांची सर्वांना जोडण्याची परंपरा आहे, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

काय आहे 'ज्ञानवापी' वाद?

वाराणसीतील ऐतिहासिक ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या मा शृगांरदेवीच्या मूर्तीच्या पूजेसाठी परवानगी दिली जावी, या मागणीची याचिका चार हिंदू महिलांनी न्यायालयात दाखल केली होत्‍या. न्यायालयाच्या आदेशात प्रतिबंधित केलेल्या वजुहखान्याची जागा वगळण्यात आली होती. मशिदीतील वजुहखान्यात शिवलिंग असल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर ही जागा प्रतिबंधित करण्यात आली. मुस्लिम पक्षाच्या वतीने हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचा दावा करण्यात आला होता. मशिदीमध्ये पुरातत्त्व विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली होती. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने मशिदी समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT