पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी.  File photo
राष्ट्रीय

'रविवारपर्यंत आरोपींना पकडा, अन्‍यथा तपास सीबीआयकडे'

डॉक्‍टर हत्‍या प्रकरणी ममता बॅनर्जींचा प. बंगाल पोलिसांना अल्‍टिमेट

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्‍कार -हत्‍या प्रकरणी पश्‍चिम बंगाल पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे. रविवारपर्यंत पोलिस या प्रकरणाचा छडा लावू शकले नाहीत, तर या प्रकरणाचा तपास आम्ही सीबीआयकडे सोपवू, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

जलदगती न्यायालय स्थापन करण्यात येणार

यावेळी माध्‍यमाशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मला कोलकाता पोलिस आयुक्तांकडून या घटनेची माहिती मिळाली. मी त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयात परिचारिका आणि सुरक्षा कर्मचारी होते, मग ही घटना कशी घडली हे समजू शकत नाही. या प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस, श्वानपथक, फॉरेन्सिक विभाग आदी पथके तपास करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. रविवारपर्यंत या प्रकरणाचा छडा लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न करावा. तसे झाले नाही तर आम्‍ही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे साेपवू."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात शुक्रवार,९ ऑगस्‍ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह शुक्रवारी आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरसोबत बलात्काराची घटना घडल्याचे समोर आले.

आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली राजीनामा

प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत महिला डॉक्टरच्या तोंडावर आणि दोन्ही डोळ्यांवर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रायव्हेट पार्टवर रक्ताच्या खुणा आणि चेहऱ्यावर नखांच्या खुणा आढळल्या. ओठ, मान, पोट, डावा घोटा आणि उजव्या हाताच्या बोटावर जखमेच्या खुणा होत्या. महिला डॉक्टरच्या हत्येनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि विद्यार्थी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची न्यायदंडाधिकारी चौकशीच्या मागणीसाठी ज्युनियर डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी संपावर आहेत. या प्रकरणी या प्रकरणी हॉस्‍टिटलमधील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्‍यात आली आहे. पोलिस तपासात त्‍याच्‍याबाबत अनेक धक्‍कादायक प्रकार उजेडात आले आहेत. दरम्‍यान, आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या प्राचार्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT