उरी येथील परिसरामध्ये चकमकीदरम्यान कारवाई करताना सुरक्षा जवान. File Photo
राष्ट्रीय

उरीतील घुसखोरीचा डाव उधळला, पूंछमध्‍ये दोन दहशतवादी जेरबंद

Jammu And Kashmir : बारामुला जिल्ह्यात चकमक

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामुला जिल्ह्यातील उरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्‍यान, पूंछ येथून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टनुसार, या भागात संयुक्त घुसखोरीविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जवानांनी गोळीबाराला दिले प्रत्युत्तर

संभाव्य घुसखोरीच्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेच्या (LOC) उरी सामान्य भागात एक संयुक्त घुसखोरीविरोधी मोहीम सुरू केली. कर्तव्यावर असणाऱ्या जवानांनी संशयास्पद हालचाली शोधून त्यांना आव्हान दिले, परिणामी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. तर जवानांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. (Jammu And Kashmir )

दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू आणि काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) आनंद जैन यांनी शनिवारी (दि.19) एएनआयला सांगितले की, अटकेमुळे अनेक ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणांची उकल करण्यात मदत झाली आहे. ग्रेनेड फेकणे आणि देशविरोधी पोस्टर लावणे आणि गुरुद्वारा, मंदिरे, रुग्णालये आणि लष्कराच्या स्थानांवर ग्रेनेड फेकणे यासारख्या कारवाया करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आम्ही अटक केल्याने आम्हाला मोठे यश मिळाले आहे. जिथे दहशतवाद्यांचा उद्देश त्या भागातील जातीय सलोखा बिघडवणे हा होता. शुक्रवारी सुरक्षा दलांनी सुरनकोट सेक्टरमधील दुंडक भागात एका दहशतवाद्याशी संबंध असलेल्या एकाला अटक केली. संशयिताकडून चार ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. (Jammu And Kashmir )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT