CJP Protest file photo
राष्ट्रीय

CJP Protest | बलात्कार, अपहरणाच्या धमक्या मिळाल्याचा आरोप: सीजेपी आंदोलक महिलेची सर्वोच्च न्यायालयात धाव!

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा तोंडी उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: 'कॉक्रोच जनता पार्टी'द्वारे नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेने, आपल्याला बलात्कार आणि अपहरणाच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा तोंडी उल्लेख केला.

सरन्यायाधीशांनी याचिका मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी आंदोलनाशी संबंधित इतर प्रकरणांसोबत सुनावणीसाठी घेण्याचे मान्य केले. " याचिकाकर्त्या महिलेला बलात्कार आणि अपहरणाच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत," असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले. "आम्ही मंगळवारी इतर प्रकरणांसोबतच हे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ," असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT