नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा,  
राष्ट्रीय

CJP protest | नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा, उद्धव ठाकरेंकडून सोनम वांगचुक यांची दूरध्वनीवरुन विचारपूस!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अभिजीत दिपके यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दूरध्वनीवरून वांगचुक यांच्या प्रकृतीची चौकशी केली

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाविरोधात सोशल मीडियातून उभी राहिलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून देशभर विद्यार्थी आंदोलन सुरू असून, त्याचाच भाग म्हणून सोनम वांगचुक जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत. आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अरविंद सावंत यांनी विद्यार्थ्यांचा लढा न्याय्य असल्याचे सांगितले. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सावंत यांनी केली.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली. या आंदोलनात आम्ही सोबत आहोत, असे सांगत हा विषय लोकसभेतही प्रभावीपणे मांडला जाईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT