Sourav Das and Ashutosh Ranka File Photo
राष्ट्रीय

'CJP'च्‍या आशुतोष रांका आणि सौरव दास यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिल्ली पोलिसांनी केली होती न्यायालयीन कोठडी वाढण्‍याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Ashutosh Ranka Sourav Das bail Delhi court : दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीबाबतचा आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्‍यात आला आहे. . दिल्ली पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडी आणखी तीन दिवसांनी वाढवण्याची मागणी केली होती.

न्‍यायालयीन कोठडीत करण्‍यात आली होती वाढ

आशुतोष रांका आणि सौरव दास यांना बुधवारी दोन्ही नेत्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.याआधी, दोन दिवसांपूर्वीच सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली होती. सोमवारी त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील नवनियुक्त विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी कोठडी वाढवण्याची विनंती केल्यानंतर, दंडाधिकाऱ्यांनी त्यांना आणखी दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

जंतरमंतरवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक

जंतरमंतर येथे झालेल्या एका आंदोलनाच्या संदर्भात या दोन नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आरोपानुसार, निर्बंध लागू असतानाही त्यांनी बंद असलेले प्रवेशद्वार ओलांडून जंतरमंतर परिसरात प्रवेश केला. तिथे पोहोचल्यावर, त्यांनी आणि इतर सीजेपी कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकवला आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. १३ ऑक्टोबर रोजी त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

अजिंक्य शिंदे यांना मिळाली होती जामीन

दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून तिहार जेलमध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते. या दोन नेत्यांवर यापूर्वी दिलेल्या जामीन बंधपत्रांच्या (bail bonds) अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याच प्रकरणात न्यायालयाने तिसरे नेते अजिंक्य शिंदे यांना दिलासा देत, नवीन जामीन बंधपत्र भरून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT