चिनी पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष पंजाबमधील होशियारपूरमध्ये सापडले  (X Account)
राष्ट्रीय

India- Pakistan Tension | चिनी पीएल-१५ क्षेपणास्त्राचे अवशेष पंजाबमधील होशियारपूरमध्ये सापडले

PL-15 Missile | पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र

अविनाश सुतार

India- Pakistan Tension on PL-15 in Hoshiarpur

नवी दिल्ली: पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्राचे अवशेष आज (दि. ९) पंजाबमधील होशियारपूरमध्ये सापडले. याबाबतचे वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिले आहे. पूर्णपणे अबाधित असलेले हे चिनी पीएल-१५ लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ते पीएएफ जेटमधून डागण्यात आले होते. परंतु, त्याचा स्फोट होऊ शकला नाही.

होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्राचे अवशेष सापडल्यानंतर भारतीय सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. क्षेपणास्त्राचे अवशेष भारतीय हद्दीत कसे काय पोहोचले, याचा शोध घेण्यासाठी भारतीय सुरक्षा अधिकारी सखोल चौकशी करत आहेत.

पीएल-१५ ची वैशिष्ट्ये

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) ने त्यांची लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी पीएल-१५ विकसित केलेले आहे. हे एक अत्यंत प्रगत लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अंदाजे २०० ते ३०० किलोमीटर अंतरावरून विमानांना लक्ष्य करण्यासाठी त्याचे डिझाइन केलेले आहे. त्यात सक्रिय रडार होमिंग मार्गदर्शन प्रणाली आहे. ते द्वि-मार्गी डेटा लिंकसह सुसज्ज आहे.

पाकिस्तान हवाई दलाने त्यांच्या प्रगत JF-17C लढाऊ विमानांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. जे PL-10 आणि PL-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच लांब पल्ल्याच्या पीएल-१५ क्षेपणास्त्र तैनात केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. पाकिस्तानी हवाई दलाने याला "प्रतिबंधात्मक पाऊल" म्हणून वर्णन केले आहे. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचे पाकच्या हवाई दलाने म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT