पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड येथे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर मध्ये एका कारवाईत १२ नक्षली ठार झाले आहेत. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
नुकताच छत्तिसगडमधील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात दोन जवान ठार झाले होते. या हल्ल्याचा छत्तिसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी निषेध व्यक्त केला होता. घनदाट जगंलात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. नक्षल्यांच्या विरोधात जोरदार मोहिम उघडण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की विजापूरमध्ये नक्षलविरोधी पथक गस्त घालत होते. यादरम्यान सकाळी ९ वाजन्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये १२ नक्षली ठार झाले. संध्याकाळ पर्यंत गोळीबारी सुरुच होती.
या कारवाईमध्ये जिल्हा रिझर्व गार्ड(DRG), रिजर्व्ह पोलिस दल, कोबरा (कमांडो बटालियन फॉर रिजोल्यूट एक्शन ) हे पथके समाविष्ट झाली होती.