पुढारी ऑनलाईन न्यूज : छत्तीसगड येथे नुकताच १२० कोटीचा रस्ते बांधकामातील घोटाळा उघडकीस आणला गेला होता. हा घोटाळा उघड करणारा पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा ३ जानेवारी रोजी मृतदेह आढळून आला होता. एका सेप्टीक टँकमध्ये २८ वर्षीय हा मृतदेह सापडला होता. मुकेश याचा चुलतभाऊ रितेश चंद्राकार याने मृतदेहाची ओळख पटवली होती. पण पोलिसांनी आता रितेश याच्यासह तिघांना याप्रकरणातील संशयीत म्हणून पकडले आहे.
बस्तर विभागातील गंगनूर ते हिरोली दरम्यान बांधल्या जात असलेल्या रोडमध्ये १२० कोटीचा घोटाळा झाला होता. हा घोटाळा पत्रकार मुकेश चंद्राकार यांनी बाहेर काढला होता. या रस्त्यासाठी ५० कोटीचे टेंडर मंजूर झाले होते. पण याच कामासाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले यासाठी टेंडरमध्ये कोणताही बदल केला गेला नाही. सुरेश चंद्राकार हा याचा ठकेदार होता.
ही बाब मुकेश यांनी उघडकीस आणली होती याची सरकारने चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे या विभागाती कॉन्ट्रक्टर लॉबीमध्ये असंतोष होता. दरम्यान १ जानेवारी रोजी रस्ता बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर सुरेश चंद्राकार च्याबरोबर मुकेश याची मिटींग ठेवली होती. मुकेशचा चुलत भाऊ रितेश याने या मिटींग ठरवली होती. त्या दिवसापासून मुकेश याचा मोबाईल बंद होता. तसेच त्याचा ठावठिकाणाही लागत नव्हता यामुळे तसेच युकेश चंद्राकार याने भाऊ हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर दोन दिवसांनी मुकेश याचा मृतदेह ठेकेदार सुरेश चंद्राकार याच्या मालकीच्या असलेल्या ठिकाणी सापडला होता. पोलिसांनी आता याप्रकरणी तीन संशयितांना पकडले आहे. यामध्ये रितेश व त्याच्या कुटूंबातील दिनेश चंद्राकार याचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात सुरेश चंद्राकार हेच मुख्य सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच मुकेश याच्या कुटुंबियांनाही धमकी मिळत आहे.
दरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी हा मुद्या उचलून धरला असून राज्यातील भाजप सरकारने या प्रकरणी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की छत्तीसगडमधील पत्रकारचा मृत्यू हा धक्कादायक असून मुकेश याला अत्यंत निर्दयीपणे मारले असून हे निंदनिय आहे. मारेकऱ्यांना तत्काळ शिक्षा व्हावी व पत्रकाराच्या कुंटूंबियांना भरपाई मिळावी’ . अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.