रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातून नक्षलवाद्यांनी एक भ्याड कृत्य समोर आली आहे. एका आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार माहितीनुसार ही घटना बिजापूरच्या पेड्डाकोर्मा गावात घडली असून यामध्ये आत्मसमर्पन केलल्या एका नेत्यासह नक्षलवाद्यांनी एका विद्यार्थ्यासह 3 जणांची हत्या केली. झिंगू मोडियम, सोमा मोडियम आणि अनिल माडवी अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय नक्षलवाद्यांनी 7 गावकऱ्यांनाही बेदम मारहाण करून जखमी केले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याच्या कुटुंबांला संपवल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुमारे एक डझन ग्रामस्थांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ज्या गावकऱ्याला मारले आहे तो गावकरी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेता दिनेश मोडियमचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता नक्षलवादी नेता वेल्ला आणि त्याच्या टीमने ही घटना घडवून आणली. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांपर्यंत पोहोचून तक्रार केली नव्हती अशी माहिती प्राप्त झाली आहे.