मध्य प्रदेशातही 'छावा' चित्रपटाची हवा, मुख्यमंत्री मोहन यादव आज मंत्री, आमदारांसह पाहणार चित्रपट File Photo
राष्ट्रीय

मध्य प्रदेशातही 'छावा' चित्रपटाची हवा, मुख्यमंत्री मोहन यादव आज मंत्री, आमदारांसह पाहणार चित्रपट

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून छावा चित्रपट टॅक्‍स फ्री

निलेश पोतदार

भोपाळ : पुढारी ऑनलाईन

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर बनवण्यात आलेला छावा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. मध्य प्रदेशातही या चित्रपटा विषयी उत्‍सुकता दिसून येत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे आपल्‍या आमदार आणि मंत्र्यासह आज सायंकाळी ७:३० वाजता हा चित्रपट पाहणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याआधीच हा चित्रपट टॅक्‍स फ्री केला आहे.

कोठे चित्रपट पाहणार ?

भोपाळच्या लेक व्यू अशोका हॉटेलमध्ये ओपन थेटर मध्ये मुख्यमंत्री मोहन यादव आपल्‍या मंत्र्यांसोबत छावा पाहणार आहेत. चित्रपटानंतर सर्व नेते एकत्र भोजन घेणार आहेत.

गोव्यातही छावा चित्रपट टॅक्‍स फ्री

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्‍या X वरून घोषणा केली होती की, छावा हा चित्रपट टॅक्‍स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्‍सवर लिहिले की, मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आणि त्‍यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट छावा गोव्यात टॅक्‍स फ्री करण्यात येणार. पुढे त्‍यांनी म्‍हटले की, हा चित्रपट संभाजी महाराजांची विरता आणि त्‍यांच्या साहसाला दर्शवतो. त्‍यांनी देव, देश आणि धर्मासाठी त्‍यांनी मुघल आणि पोर्तुगिजांविरूद्ध लढाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT