AI Awesome use | चॅटजिपिटीचा सॅम ऑल्टमनही बुचकळ्यात पडेल, 
राष्ट्रीय

AI Awesome use | चॅटजिपिटीचा सॅम ऑल्टमनही बुचकळ्यात पडेल, पठ्ठ्याने ChatGPT च्या मदतीने शोधून काढल्या चपला, उजैनच्या मंदिरातील जुगाड पहा!

कोडिंग सारख्या अवघड कामांबरोबर देशी जुगाडही AI च्या मदतीने

Namdev Gharal

AI Awesome use सध्या एआय AI चा जमाना आहे असे म्हटले जाते. सर्वच टेक कंपन्यांनी आपले AI टूल विकसीत केले आहेत. ChatGPT, Gemini, Groke, ही काही महत्‍वाची नावे. एआय च्या माध्यमातून माहितीच्या जगात आणखी एक क्रांती झाली असे म्हणता येईल, इंटरनेवरील अजस्त्र माहिती एका सेंकदात तुम्हाला हवी त्‍या स्वरुपात देण्याचे काम एआय करत आहे. भारतीयही एआय वापरण्यात कमी पडत नाहीत. अनेकजण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर कोडिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा अभ्यासासाठी वापर करत आहेत. पण नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुणाने एआयचा वापर करुन केलेला जुगाड चांगलाच व्हायरल होत आहे.

ChatGPT ने चपलांच्या ढिगातून शोधून काढले चप्पल

भारतात तंत्रज्ञानाचा असा काही 'देसी जुगाड' पाहायला मिळतो, ज्याची कल्पना कदाचित ChatGPT बनवणाऱ्या सॅम ऑल्टमननेही केली नसेल. हा व्हिडीओ पाहून चॅटजिपीटीचा संस्थापकही बुचकळ्यात पडेल. कारण या उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात गर्दीत हरवलेल्या चपला शोधण्यासाठी एका तरुणाने थेट ChatGPT चा वापर केला आणि अवघ्या काही मिनिटांत आपल्या चपला शोधून काढल्या.

नेमकी घटना काय?

शुभम बोरकर नावाचा एक मुलगा गोव्याहून उज्जैनला महाकालेश्वराच्या दर्शनासाठी आला होता मंदिरासमोर भाविकांच्या चपलांचा डोंगरच होता. तिथे इतक्या चपला होत्या की त्याच्या चपला हरवल्या आणि त्याला त्या सापडत नव्हत्या. त्याने काय करावे? म्हणून त्याने आपला फोन काढला, चॅटजीपे उघडले, सर्व चपलांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले, ते चॅटजीपेवर अपलोड केले. व आपल्या क्लॉगचा एक चांगला फोटो अपलोड केला. व चॅटजिपीटीला हे चप्पल शोधण्याचा प्रॉम्ट दिला. यानंतर ChatGPT ने तरुणाचे चप्पल अचूक पणे शोधूनही दिले.

ChatGPT ने असा लावला चपलेचा शोध

चप्पल सापडत नसल्याने. 'या गर्दीमध्ये माझी ही चप्पल शोधून दे,' अशी कमांड त्याने AI ला दिली.ChatGPT ला प्रॉम्ट मिळल्यानंतर, ChatGPT ने लगेचच इमेज अ‍ॅनालिसिस तंत्रज्ञानाचा वापर करून ढिगाऱ्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी त्याची चप्पल पडली आहे, ते अचूक दाखवून दिले.

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ChatGPT तयार करताना त्याचा वापर जटिल कोडिंग आणि व्यवसाय वाढवण्यासाठी होईल असा विचार केला असेल; परंतु भारतात त्याचा असाही एआयाचा वापर दैनंदिन 'जुगाड' म्हणून वापर होईल, अशी कल्पना क्वचितच कोणी केली असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT