राष्ट्रीय

Brij Bhushan Singh : महिला कुस्तीपटू लैंगिक छळप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंहविरोधात आरोप निश्चित

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात न्यायालयाने मंगळवारी आरोप निश्चित केले आहेत. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ आणि विनयभंगासह त्यांना धमकावण्याचे गंभीर आरोप निश्चित केले आहेत. यासंदर्भात महिला कुस्तीपटूंनी फौजदारी खटला दाखल केला आहे. (Brij Bhushan Singh)

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांबाबत न्यायालयाने त्यांना गुन्ह्याची कबुली देण्याविषयी विचारणा केली. मात्र, आपल्यावरील आरोप खोटे असल्याने ते स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणात सहआरोपी विनोद तोमर यांच्याविरुद्धही न्यायालयाने आरोप निश्चित केले.

दरम्यान, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणात अडकलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापून भाजपने कैसरगंज मतदारसंघात त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

SCROLL FOR NEXT