पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर इंडियाच्या दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या विमानात बुधवारी (दि.१५) बॉम्बच्या असल्याची माहिती मिळाली. या माहितीने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. प्रवासी दुसऱ्या विमानाने वडोदरासाठी रवाना झाले. तपासाअंती ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
दिल्लीहून वडोदरा जाणाऱ्या विमानातील स्वच्छतागृहात एकचिठ्ठी सापडली. टिश्यू पेपरवर लिहिलेल्या या चिठ्ठीत "बॉम्ब" शब्दाचा उल्लेख होता. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, जेव्हा क्रू मेंबरला टिश्यू पेपर दिसला तेव्हा विमान टेकऑफसाठी तयार होते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रवासी दुसऱ्या विमानाने वडोदरासाठी रवाना झाले. फ्लाइटची तपासणी करण्यात आली आणि अधिकाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही.
j;j