Kerala Name Change: केंद्र सरकार केरळ राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्तावाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याची शक्यता आहे. केंद्री मंत्र्यांना कॅबिनेट मिटिंगपूर्वी लवकर येण्यास सांगण्यात आलं आहे. त्यावेळी फोटो सेशल होणार आहे. विशेष म्हणजे सेवा तीर्थ अर्थात नवीन पीएमओ आणि कॅबिनेट सेक्रेटरिएटमधील ही पहिली कॅबिनेट मिटिंग आहे.
केरळ विधानसभेनं केंद्र सरकारला केरळचे नाव केरळम करण्यासाठी घटना दुरूस्ती करण्याची विनंती करणारे विधेयक पास केलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्याचं नाव केरळम करण्यासाठी घटनेच्या आर्टिकल ३ अंतर्गत हे विधेयक आणलं आहे.
त्यांनी केरळम याचा उल्लेख हा मल्याळममध्ये करतात आणि ही मागणी मल्याळम भाषा बोलणाऱ्या कम्युनिटींना एकत्रित आणणारा आहे असं सांगितलं. विजयन म्हणाले, 'घटनेच्या पहिल्या शेड्युलमध्ये राज्याचं नाव हे केरळ असं लिहिलं आहे. ही विधानसभा केंद्र सरकारला त्वरित उचित पावलं उचलून संविधानाच्या आर्टिकल ३ अंतर्गत केरळचे नाव आठव्या शेड्युलमधील सर्व भाषांमध्ये केरळम करण्याची विनंती करत आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये हे विधेयक एकमतानं पारित झालं होतं.