राष्ट्रीय

चक्रीवादळाचा तब्बल चार राज्यात हाहाकार, पण केंद्राकडून प्रथम गुजरातला १ हजार कोटींची मदत!

Pudhari News

गांधीनगर; पुढारी ऑनलाईन : अरबी समुद्रातून आलेल्या ताउक्ते चक्रीवादळाने चार राज्यामध्ये हाहाकार कोट्यवधी नुकसान झाले आहे. राज्यात ताउक्ते चक्रीवादळाने हाहाकार केल्यानंतर गुजरातकडे मार्गक्रमण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने गुजरातचा आज दौरा करत हवाई पाहणी केली. 

अधिक वाचा : दिल्ली : दीड महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या खाली

या पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील तातडीच्या मदत कार्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्यातील नुकसानीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकार एक आंतर-मंत्रालयीन पथक देखील राज्य दौर्‍यासाठी तैनात करणार आहे. त्याचबरोबर वादळात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुबीयांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत करण्यात येणार आहे. 

अधिक वाचा : तोक्ते चक्रीवादळ : ओएनजीसीचे ५१ कर्मचारी अजून बेपत्ता; २२ मृतदेह मिळाले 

अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ताउक्ते चक्रीवादळ स्थितीसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून ओएनजीसी बार्जवरील जवानांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाचा आढावा घेतला. गुजरातमध्ये चक्रीवादळाने बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आणि बरीच घरे व रस्ते खराब झाले. 

अधिक वाचा : नितीन गडकरींकडून काल 'तो' सल्ला अन् आज स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT