CCPA Fine Dark Patterns Apps pudhari
राष्ट्रीय

CCPA Fine Dark Patterns Apps: हँडलिंग चार्जेस, डोनेशनचा डार्क पॅटर्न्स झोल... झेप्टो, बूक माय शोसह ९ अॅप्सला २० लाखाचा दंड

Anirudha Sankpal

CCPA Fine Dark Patterns Apps: तुम्ही ग्रोसरी ऑनलाईन ऑर्डर करता.. तुम्हालाही मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायचा कंटाळा येतोय. तुम्ही तुमची मुव्ही तिकीट ऑनलाईनच बूक करताय... तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी किंमत मॅनेजेबल वाटते. मात्र ज्यावेळी तुम्ही पेमेंट करता त्यावेळी अचानक बील बदलतं अन् हँडलिंग चार्जेस असा काही शुल्काचा प्रकार समोर येतो. तुमचं पेमेंट बील वाढतं. तुमचा स्मॉल डोनेशनचा बॉक्स कायम टिक केलेलाच असतो.

सुरूवातीला ती फार छोटी रक्कम दिसते. मात्र शेवटी बील पेड करताना ती रक्कम चांगलीच खिशाला ताण देते. आता सरकारने या गोष्टीची दखल घेतली असून अशा प्रकारची कट प्रॅक्टिस, डार्क पॅटर्न्सवर आळा घालण्याचा मोहीम सुरू झालीआहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण अथोरिटीने ९ अशा डार्क पॅटर्न्स राबवणाऱ्या डिजीटल प्लॅटफॉर्मला दंड ठोठावला आहे. त्यांच्यावर ग्राहकांना जे निवडायचं नाही ते निवडण्यासाठी भाग पाडलं जाते. सरकारने याबाबतची माहिती राज्यसभेत दिली आहे. दंड ठोठावलेल्या डिजीटल अॅप्समध्ये झेप्टो, बूक माय शो, इंडिगो आणि फिजिक्स वाला या डिजीटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. सीसीपीएला असं आढळून आलं की ग्राहकांना सुरूवातीला जी किंमत दाखवली जाते ती नंतर हँडलिंग चार्जेस आणि मेंबरशिप फी द्वारे वाढवली जाते. सुरूवातीला हँडलिंग चार्जेस त्यात समाविष्ट नसतात अन् नंतर ग्राहकांना दुसरीच किंमत दाखवली जाते. शेवटी ग्राहकांच्या खिशातून जास्त पैसे जातात.

अतिरिक्त मेंबरशिप ही बास्केट स्निकिंगमध्ये समाविष्य असते. यासाठी झेप्टोला ७ लाखाचा दंड झाला आहे. ग्राहकांच्या दृष्टीकोणातून हे खूप निराशाजनक असतं. त्यांना आधी एक किंमत तुम्हाला द्यायची आहे असं दर्शवलं जातं. नंतर पेमेटं करताना दुसरीच अमाऊंट येते.

बूक माय शोला देखील अशाच प्रकारची सवय आहे. ते प्रती तिकीट १ रूपया चॅरिटी फी म्हणून घेतात. समस्या एक रूपयाची नाही तर तो ऑप्शन आधीच निवडेला असतो त्याचा आहे. त्यामुळं तुम्ही ग्राहकाला गृहीत धरून ती किंमत त्याच्या खिशातून घेता. त्याला नको असेल तर त्या ग्राहकानेच सजग राहून तो निवडलेला पर्याय रिमूव्ह करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT