राष्ट्रीय

नीट परीक्षा गोंधळाची सीबीआय चौकशी करा, ठाकरे गटाची मागणी

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षा निकालाच्या गोंधळाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे.

राष्ट्रीय तपास चाचणी अर्थात एनटीएने घेतलेल्या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप देशभरातील विद्यार्थी व पालकांनी केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती चतुर्वेदी यांनी शिक्षणमंत्र्यांना केली आहे.

देशातील विविध परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकार होत आहेत. सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या संस्था आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नीट परीक्षेतही पेपरफुटी आणि काही विद्यार्थांना मनमानी पद्धतीने ग्रेस मार्क देण्याचा प्रकार घडला आहे. परीक्षा केंद्रावरील गोंधळ ही सुद्धा गंभीर बाब आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या करियरचा हा प्रश्न असल्याचे चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. .

SCROLL FOR NEXT