पुढारी ऑनलाईन डेस्क : देशामध्ये झालेल्या नेट पेपरफुटीनंतर सीबीआयने आता पहिले कारवाई केली आहे. या संदर्भात 'नीट' पेपर लीक प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने 13 आरोपींवर पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती सरकारी वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.
सीबीआयने या प्रकरणात १३ आरोपींची नावे दिली आहेत. यामध्ये आरोपपत्रात नितीश कुमार, अमित आनंद, सिकंदर यादव, आशुतोष कुमार-1, रोशन कुमार, मनीष प्रकाश, आशुतोष कुमार-2, अखिलेश कुमार, अवधेश कुमार, अनुराग यादव, अभिषेक कुमार, शिवनंदन कुमार आणि आयुष राज यांचा समावेश आहे. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत 40 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 15 जणांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच असून 58 ठिकाणी शोध सुरु आहे.