प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

दिल्‍लीत सरकार बदलताच 'सीबीआय' ॲक्‍शन मोडवर! 'परिवहन'च्या ६ अधिकाऱ्यांना अटक

विधानसभा निवडणुकीनंतर भ्रष्‍टाचार प्रकरणी मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने (सीबीआय) आज (दि.१२) दिल्ली वाहतूक विभागातील सहा अधिकाऱ्यांना अटक केली. सत्ताधारी आम आदमी पक्षाचा (आप) अलिकडच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सीबीआयची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. (Delhi Transport Department corruption case)

दिल्‍लीतील परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआयकडे तक्रारी आल्‍या हाेत्‍या. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईपूर्वी तक्रारींचे पडताळणी करण्‍यात आली. तक्रारींची पडताळणी करताना विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाल्‍याचे प्राथमिक माहिती मिळाली.यानंतर सीबीआयने परिवहन विभागाच्‍या सहा अधिकाऱ्यांना अटक केली.

सीबीआयच्‍या कारवाईबाबत बोलताना काँग्रेसचे नेते उदित राज म्‍हणाले की, "आम आदमी पार्टीचे सरकार भ्रष्ट होते. जल बोर्ड घोटाळा, कॅग अहवाल, दारू घोटाळा असे अनेक घाेटाळे या सरकारच्‍या काळात झाले. आता भाजपचे सरकार आले आहे. नवीन सरकार प्रत्यक्षात भ्रष्‍टाचाराविरोधात कोणती कारवाई करते ते पाहूया"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT