गेवराईत कार-दुचाकीचा अपघात Pudhari Photo
राष्ट्रीय

गेवराईत कार-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : कार चालकांनी समोरुन येणा-या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.5) गेवराईत घडली. या अपघातात जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे. बीड-जालना राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई (जि.बीड)शहरातील एका पुलाजवळ शहागड कडुन भरधाव वेगात येणा-या विस्टा कारन समोरुन येत असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात एकामागोमाग असलेले तिन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अपघातातील जखमी दुचाकीस्वार यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे. कार चालक मद्यधुंद आवस्थेत असल्याचे आपघात स्थळी मदतीला आलेल्या नागरीकांनी सांगीतले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.दरम्यान, आपघातात जखमींची नावे पोलीस अन् डाॅक्टर यांच्याशी संपर्क झाला नसल्याने उपलब्ध झाली नाहीत. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT