पुढारी ऑनलाईन डेस्क: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये केकमध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ आढळून आले आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने केकशी संबंधित संभाव्य जोखमींबद्दल लोकांना चेतावणी देणारी ॲडव्हायजरी आज (दि.१०) जारी केली आहे. यामुळे येथील लोक चिंतेत सध्या केक संदर्भात चिंतेत आहेत. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'बंगळुरूमधील अनेक बेकरींमधून गोळा केलेल्या केकच्या 12 नमुन्यांमध्ये अनेक कर्करोग निर्माण करणारे घटक आढळले आहेत.' केकमधील हे घटक कर्करोगास कारणीभूत असल्याचेही विभागामने म्हटले आहे.
यापूर्वी कर्नाटक सरकारने कॉटन कँडी आणि गोबी मंचुरियनमध्ये देखील कॅन्सर कारणीभूत घटक आढळ्याचे म्हटले होते. यावरून सरकारने रोडामाइन-बीसह कृत्रिम खाद्य रंगांच्या वापरावर कर्नाटक राज्यात बंदी घातली होती. यानंतर कर्नाटक सरकारने सल्ला निवेदन जारी केले आहे.
कर्नाटक सरकारने तपासलेल्या 235 केक नमुन्यांपैकी 223 सुरक्षित असल्याचे आढळले, परंतु 12 मध्ये कृत्रिम रंग धोकादायक पातळीवर होते. कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाने म्हटले आहे की, केकच्या रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट यांसारख्या लोकप्रिय फ्लेवरमध्ये हे घटक आढळून आले आहेत. जे विविध रंगांनी बनवले जातात, त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, असे देखील विभागाने म्हटले आहे.