नवी दिल्ली : कंबोडियातून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला ‘म्यूल’ बँक खाती पुरवणाऱ्या पाच आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली. 
राष्ट्रीय

Bank OTP Fraud | परदेशी सायबर गुन्हेगारांना बँक ओटीपी पाठवणारे कंबोडियन 'एसएमएस टूल्स'

पाचजणांना अटक; बँकेचे मेसेज आणि ओटीपी थेट परदेशात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली पोलिसांच्या 'इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स' पथकाने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. द्वारका येथील एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये 'एसएमएस टूल्स' नावाचे संशयास्पद ॲप आढळून आले आहे. हे ॲप बँकेचे व्यवहार आणि ओटीपी परदेशातील मुख्य सूत्रधारांना पाठवण्यासाठी सेट केले होते. यामुळे कंबोडियात बसलेले सायबर गुन्हेगार भारतात न येता येथील बँक खाती सहजपणे हाताळत होते.

पोलिस तपासात असे समोर आले की, अटक केलेले आरोपी सर्वसामान्यांची बँक खाती मिळवून ती सायबर गुन्हेगारांना भाड्याने किंवा विकत देत असत. या खात्यांच्या व्यवहारासाठी सात टेलिग्राम चॅनेल्सचा वापर केला जात होता. फसवणुकीचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वेगाने वळवून (लेयरिंग) त्याचा माग काढणे कठीण केले जात होते. पोलिसांनी आरोपींकडून सहा मोबाईल फोन, एक चेकबुक आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचे पुरावे जप्त केले आहेत.

कंबोडियातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास

तपासादरम्यान एका खात्यात सुमारे २ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळले, ते पोलिसांनी तत्काळ बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने गोठवले आहेत. अनीश खान, इंतेखाब, अल्ताफ हुसेन, मो. महफूझर रहमान आणि इजहार आलम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे आंध्र प्रदेशातील दोन सायबर गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, कंबोडियातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT