Air Hostess Rape Case | हवाईसुंदरीवर कॅब चालकाचा बलात्कार  File Photo
राष्ट्रीय

Air Hostess Rape Case | हवाईसुंदरीवर कॅब चालकाचा बलात्कार

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद; वृत्तसंस्था : हैदराबादमध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या एका महिला केबिन क्रू सदस्यावर कॅब चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानतळावर ड्युटीसाठी जात असताना आरोपीने मार्ग बदलून निर्जन ठिकाणी नेले आणि कॅबमध्येच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय कॅब चालकाला अटक केली असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

२० जुलै रोजी संबंधित महिला ड्युटीसाठी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी कॅबने निघाली होती. विमानतळाजवळ पोहोचत असताना चालकाने लघुशंकेसाठी थांबायचे आहे, असे सांगून मुख्य रस्ता सोडून कमी वर्दळीच्या मार्गावर गाडी वळवली. यानंतर एका बांधकाम सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेजवळ त्याने गाडी थांबवली. काही वेळाने चालक मागील दरवाजा उघडून गाडीत बसलेल्या महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी महिलेला त्या निर्जन ठिकाणी सोडून कॅबसह पसार झाला. महिलेने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कॅब चालकाला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT