प्रातिनिधिक छायाचित्र File photo
राष्ट्रीय

पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये भाजप, पश्‍चिम बंगालमध्‍ये 'तृणमूल'चे वर्चस्‍व

१४ राज्यांमधील ४८ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्‍ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक निकालाबरोबरच देशातील १४ राज्यांच्या ४८ मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीचे आज (दि.२३) निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्वाधिक २० विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. काँग्रेसला ७ तर तृणमूल काँग्रेसचा ६ मतदारसंघात विजय झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्‍ये ६ जागांवर भाजपच्‍या उमेदवारांचा विजय

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबरोबर देशातील १४ राज्यांमध्ये ४८ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांपैकी सर्वात जास्त ९ विधानसभेच्या जागांवर उत्तर प्रदेशात निवडणुक झाली होती. या ९ जागांपैकी ६ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर समाजवादी पक्षाला २ आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाला १ जागेवर यश मिळाले आहे.

पश्‍चिम बंगालमधील सर्व पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेचे वर्चस्‍व

पश्चिम बंगालच्या ६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या सर्व जागांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

राजस्‍थानमधील ७ पैकी ५ जागांवर भाजप विजयी

राजस्थानमधील ७ पैकी ५ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर भारत आदिवासी पक्षाला १ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. आसाममध्ये ५ पैकी ३ भाजप, युनीयटेड पीपल्स पक्ष (लिबरल) १ आणि आसाम गण परिषद १ जागेवर विजय झाला. पंजाबमधील ४ पैकी ३ जागांवर आम आदमी पक्ष आणि १ जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. बिहारमध्ये ४ पैकी २ भाजप, १ हिंदुस्तानी अवामी मोर्चा , जनता दल (संयुक्त) १ जागा मिळाली आहे. कर्नाटकच्या ३ जागांवर काँग्रेसला यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील २ पैकी १ काँग्रेस आणि १ भाजप, केरळच्या २ पैकी काँग्रेस १ आणि माकप १, विजय मिळाला आहे. तर उत्तराखंड, छत्तीसगढ, गुजरात या राज्यांतील प्रत्येकी १ जागेवर निवडणूक झाली. या तिन्ही राज्यांत भाजपचा विजय झाला आहे. सिक्कीमच्या २ जागांवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. तर मेघालयची १ जागा नॅशनल पीपल्स पक्षाला मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT