Adani couple serves prassad Pudahri
राष्ट्रीय

Adani couple serves prassad | पुरीच्या रथयात्रेत गौतम अदानी यांनी पत्नीसोबत बनवला प्रसाद, व्हिडिओ व्हायरल

Adani couple serves prassad | गौतम आणि प्रीती अदानी दाम्पत्याचा सेवाभाव, भक्त, स्वयंसेवक, भाविकांना अन्नदान

पुढारी वृत्तसेवा

Puri Jagannath Rath Yatra Festival 2025 Lord Jagannath procession Gautam Adani Priti Adani serves prasad viral video Adani couple cooking prasad

पुरी : पुरीमध्ये सुरू असलेल्या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या दिव्य आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांची पत्नी डॉ. प्रीती अदानी यांनी आपल्या सेवाभावाने सर्वांचे लक्ष वेधले.

या दाम्पत्याने पुरीतल्या इस्कॉन किचनमध्ये ‘प्रसाद सेवा’ मध्ये सहभागी होत स्वतः भोजन तयार केले आणि भाविकांना प्रेमाने प्रसाद वाटप केला.

अदानी दांपत्याचा सेवाभाव

गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांनी इस्कॉनच्या प्रसाद सेवा उपक्रमात सहभागी होत हजारो भाविकांसाठी अन्नप्रसाद तयार करण्यात हातभार लावला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये हे दोघंही भक्तांमध्ये प्रसाद वाटताना दिसून येत आहेत.

या उपक्रमाअंतर्गत अदानी समूहाने यात्रेच्या काळात पुरीत ‘प्रसाद सेवा’ सुरू केली असून, यात्रेच्या व्यवस्थापनात कार्यरत स्वयंसेवकांनाही या सेवेचा लाभ मिळत आहे.

लाखो भाविकांची उपस्थिती

या वर्षीची रथयात्रा 27 जूनपासून सुरू झाली असून, 8 जुलैपर्यंत चालणार आहे. जगभरातून लाखो भाविकांनी या उत्सवासाठी पुरीमध्ये हजेरी लावली आहे. भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची भव्य रथयात्रा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली.

श्रीमंदिरातून गोंडिचा मंदिरापर्यंतचा हा प्रवास पारंपरिक विधी आणि भक्तिगीते यांमध्ये पार पडतो.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माजी यांचे आवाहन

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनीही भाविकांचे स्वागत करत भक्तीपूर्वक सहभागी होण्याचे आवाहन केले. “रथयात्रेत श्रद्धा आणि भक्तीने सहभागी व्हा. महाप्रभूंच्या रथावरील दिव्य दर्शनाने आपले जीवन पावन होईल,” असे मुख्यमंत्री माजी यांनी आपल्या संदेशात सांगितले.

गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे हे सेवाभावाचे उदाहरण भक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संगम आहे. पुरीत रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही सेवा अनेकांसाठी प्रेरणादायक ठरते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT