लखनऊत इमारत कोसळली; मृतांची संख्या ८ वर  Pudhari
राष्ट्रीय

लखनऊत इमारत कोसळली; मृतांची संख्या ८ वर

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगर भागात शनिवारी (दि.८) संध्याकाळी इमारत कोसळली. यात आतापर्यंत आठजणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण जखमी झाले आहेत. असे मदत आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. जखमींना उपचारासाठी कृष्णा नगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Lucknow Building Collapse)

मृतांचा आकडा ८ वर

पोलिस उपायुक्त आर.एन. म्हणाले, "आमच्या बचाव कार्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यांना पुढील तपासासाठी वैद्यकीय संस्थांमध्ये पाठवण्यात आले आहे. तर २८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. आम्ही पुढील ५-६ तासांत बचाव कार्य पूर्ण करू आणि आजूबाजूच्या इमारतींना सुरक्षित ठेवू,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही इमारत कोसळण्याच्या घटनेची दखल घेत अधिका-यांना मदतकार्य लवकर करण्याच्या सूचना दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT