Delhi Building Collapse : ईशान्य दिल्लीतील सीलमपूर भागात आज (दि. १२) सकाळी चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सुमारे १२ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मदतकार्य सुरू आहे.
सीलमपूरमध्ये एक ग्राउंड प्लस थ्री इमारत कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सध्या पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) पथके मदत व बचावकार्यात गुंतली आहेत. स्थानिक नागरिकही ढिगारा उपसण्याच्या कामात मदत करत आहेत.
शुक्रवारी (दि. ११) आझाद मार्केट परिसरात मेट्रोच्या जनकपुरी पश्चिम-आर. के. आश्रम मार्ग कॉरिडॉरसाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या बांधकाम क्षेत्रात एक जीर्ण इमारत कोसळली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बाडा हिंदूराव पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.