Budget of Maharashtra
budget 2024  Pudhari File Photo
राष्ट्रीय

Budget 2024 : रोजगार आणि कौशल्‍यासाठी विशेष PM पॅकेज

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी रोजगार आणि कौशल्य निर्मितीसाठी पाच योजनांचे पीएम पॅकेज जाहीर केले. मोदी 3.0 सरकारने शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी दोन लाख कोटींची तरतूद केली आहे.

केंद्र सरकारचे ४ क्षेत्रांवर विशेष लक्ष

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, "अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे आम्‍ही देशातील गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांसाठी, आम्ही सर्व प्रमुख पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. 80 कोटींहून अधिक लोकांना लाभ देणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवली आहे."

SCROLL FOR NEXT