Budget 2024
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी मोठी घोषणा केली. Representative image
राष्ट्रीय

Budget 2024| केंद्रीय अर्थसंकल्‍पात महिला आणि मुलींसाठी मोठी घोषणा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महिला आणि मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. (Budget 2024)

महिला आणि मुलींच्या योजनांसाठी ३ लाख कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री यांनी निर्मला सीतारामण म्हणाल्या, देशाचा आर्थिक विकासाची वाटचाल दमदार सुरु आहे. आगामी वर्षांमध्‍येही ताे कायम राहणार आहे.भारताची चलनवाढ कमी आणि स्थिर राहून ४% लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी रु. 3 लाख कोटी अर्थसंकल्पात करण्यात आली असल्‍याची घाेषणाही त्‍यांनी केली.

शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी मोठी तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, " आगामी ५ वर्षांत ४.१ कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ योजना आणि उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे, यासाठी २ लाख कोटी रुपये केंद्रीय खर्च आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे." ( Budget 2024)

सीतारामन यांनी रचला इतिहास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प (Budget 2024 ) सादर केला . माजी केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई (हे पुढे पंतप्रधानही बनले होते.) यांचा विक्रम मागे टाकून एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे.

सीतारामन या पुढच्या महिन्यात ६५ वर्षांच्या होतील. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पूर्ण-वेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केल्यापासून, सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह सलग ६ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. आज (दि.२३) त्या सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग ५ अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम त्यांनी मोडला.

SCROLL FOR NEXT