राष्ट्रीय

Budget 2024-25 : आंध्र प्रदेशसाठी १५,००० कोटी रुपयांची तरतूद

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यातील वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आमच्या सरकारने ठोस प्रयत्न केले आहेत. राज्याची भांडवलाची गरज ओळखून आम्‍ही चालू आर्थिक वर्षात आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या इमारतीसाठी 15000 कोटी रुपयांची तरतूद करणार आहाेत, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज ( दि. २३) अर्थसंकल्‍प सादर करताना केली.

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्‍हणाल्‍या, चालू आर्थिक वर्षात आम्‍ही आंध्र प्रदेशसाठी १५ हजार कोटी रुपयांच्‍या अतिरिक्‍त तरतूद करणार आहोत. राज्‍यातील शेतकऱ्यांची जीवनरेखा असलेल्या पोलावरम सिंचन प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार वित्तपुरवठा करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली.

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यांतर्गत, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, "पाणी, वीज, रेल्वे आणि रस्ते... विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉरवर आणि...हैदराबाद-बंगलोर औद्योगिक कॉरिडॉरवर" आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांनी स्‍पष्‍ट केले. राज्यातील तीन जिल्ह्यांसाठी मागास प्रदेश अनुदानही त्‍यांनी जाहीर केले.

SCROLL FOR NEXT