शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी १.४८ लाख कोटी  Pudhari Photo
राष्ट्रीय

Budget 2024| शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी १.४८ लाख कोटी

निर्मला सीतारामण यांनी रचला इतिहास

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी, शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. Budget 2024

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "मला ५ वर्षांतील ४.१ कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ योजना आणि उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे, यासाठी २ लाख कोटी रुपये केंद्रीय खर्च आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे..." Budget 2024

निर्मला सीतारामण यांनी रचला इतिहास

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प (Budget 2024 ) सादर केला . माजी केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई (हे पुढे पंतप्रधानही बनले होते.) यांचा विक्रम मागे टाकून एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे.

सीतारामन या पुढच्या महिन्यात ६५ वर्षांच्या होतील. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पूर्ण-वेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केल्यापासून, सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह सलग ६ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. आज (दि.२३) त्या सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग ५ अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम त्यांनी मोडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT