CGST bribe case
झाशी : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने आज (दि. ३१ डिसेंबर) उत्तर प्रदेशातील झाशी येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) कार्यालयातील लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ७० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी आयआरएस-सी अँड आयटी उपायुक्तांसह सीजीएसटीचे दोन अधीक्षक, एका वकील आणि एका खासगी कंपनीच्या मालकाला अटक केली असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
GST चुकवेगिरीच्या प्रकरणात खासगी कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी १.५ कोटी रुपयांची लाच मागितले होते. बीआयने सापळा रचून आरोपी उपायुक्त सीजीएसटी झाशी यांच्या सांगण्यावरून ७० लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन आरोपी अधीक्षकांना रंगेहाथ पकडले. दोन्ही अधीक्षक आणि सीजीएसटीच्या उपायुक्तांना इतर आरोपींसह अटक करण्यात आली आहे. यानंतर अधिकार्यांच्या घरामध्ये घेतलेल्या झडतीमध्ये सुमारे ९० लाख रुपये रोख, अनेक मालमत्तेची कागदपत्रे आणि मोठ्या प्रमाणात दागिने व मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. शोधकार्य सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत एकूण १.६० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
यापूर्वी, २६ डिसेंबर रोजी, सीबीआयने देवास, बीएनपी येथील केंद्रीय विद्यालयाच्या एका वरिष्ठ सचिवालय सहाय्यकाला ६०,००० रुपयांची लाच घेताना अटक केली होती, असे केंद्रीय संस्थेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.सीबीआयने २४ डिसेंबर रोजी एका लेखी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता, ज्यात आरोप करण्यात आला होता की, आरोपी, जो एक वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आहे, त्याने सुरक्षा आणि मनुष्यबळ सेवांशी संबंधित बिले मंजूर करण्यासाठी ६०,००० रुपयांची लाच मागितली होती. सीबीआयने २५ डिसेंबर रोजी सापळा रचला आणि आरोपीला बँकिंग चॅनेलद्वारे ६०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नंतर आरोपीला अटक करून २६ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.