नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसद आणि लाल किल्ल्यावर बॉम्ब हल्ला करणार असल्याच्या धमकीचा कॉल केरळच्या सीपीआय (एम) पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही. शिवदासन यांना आला. यासंबंधी त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून कळवले. 'सिख्स फॉर जस्टिस' या संघटनेकडून गुरपतवंत सिंह पन्नूच्या नावाने हा कॉल आल्याचे खासदारांनी सांगितले.
राज्यसभा सभापतींनी लिहीलेल्या पत्रात खासदार शिवदासन यांनी म्हटले आहे की, मला २१ जुलै २०२४ रोजी रात्री साडेअकरा वाजता एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंजमध्ये खासदार ए. रहीम यांच्यासमवेत असताना कॉल आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी खासदारांनी नवी दिल्लीच्या प्रभारी डीसीपींना कळवले आहे आणि अधिकृत तक्रार दाखल केली आहे.