प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

Bomb Threat : उड्डाणादरम्यान बॉम्बने उडविण्‍याची धमकी, मुंबईहून वाराणसी निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Air India Flight emergency landing : दिल्‍ली कार बॉम्‍बस्‍फोटाची घटना ताजी असतानाच आज मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला उड्डाणादरम्यान बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विमानाचे तात्काळ आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर बॉम्ब शोध पथक विमानाची कसून तपासणी करत आहे. अधिकाऱ्यांनी धमकीच्या स्रोताचा शोध सुरू केला आहे.

प्रवाशांमध्‍ये पसरली घबराट

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बॉम्बच्या धमकीच्या धोक्याची सूचना आल्याने घबराट पसरली. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर, शोध मोहीम सुरू करण्यात आली. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसही शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

सर्व सुरक्षा तपासणीनंतर पुन्‍हा विमान उड्डाणाला मिळणार परवानगी

वाराणसीला जाणाऱ्या एका विमानाला सुरक्षा धमकी मिळाली. प्रोटोकॉलनुसार, सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीला तात्काळ माहिती देण्यात आली आणि सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित सुरू करण्यात आल्या. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सर्व अनिवार्य सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला ऑपरेशनसाठी परवानगी दिली जाईल, असे एअर इंडियाने स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT