नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, गिरीराज सिंह यांच्यासह ४० नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्ली विधानसभेत भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल अशा ३ नेत्यांचा समावेश भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देशातील ७ राज्यांचे मुख्यमंत्री आणि जवळपास डझनभर केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.