राष्ट्रीय

महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना मान; मंत्रिपदाची घेणार शपथ

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून भाजपच्या रक्षा खडसेंना मान मिळाला आहे. नरेंद्र मोदी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह रक्षा खडसे या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

'एनडीए' मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता होईल. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी व शहा यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे. नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

नरेंद्र मोदींनी शपथ घेण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन येत आहेत. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप नेते पीयूष गोयल, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, जेडीएस नेते कुमारस्वामी, एचएएमचे जितन राम मांझी, आरएलडी नेते जयंत चौधरी, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, जेडीयू नेते रामनाथ ठाकूर आणि आप दलाच्या अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याचे सांगण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात 36 मंत्री शपथ घेणार?

एकूण 36 मंत्री शपथ घेतील, असे सांगण्यात येते. तेलुगू देसम आणि जदयुमधून प्रत्येकी 2 आणि शिवसेनेचा एक कॅबिनेट मंत्री त्यात असेल. याशिवाय राष्ट्रवादी (अजित पवार), लोजप आणि जेडीएसच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्रीही यावेळी शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT