राष्ट्रीय

BJP News| भूपेंद्र पटेल, अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्र भाजप निवडणूक प्रभारी, सहप्रभारी पदी नियुक्ती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती (BJP News) केली आहे, या संदर्भातील माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या X अकाऊंटवरून दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमधील आगामी निवडणुकीसाठी राज्य प्रभारी आणि सहप्रभारी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि बिप्लब कुमार देव यांची हरियाणाचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नेमणूक (BJP News) केल्याचेही ते म्हणाले.

भाजप नेते शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमा हे झारखंडसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी असणार आहेत. तर जम्मू काश्मीरसाठी जी किशन रेड्डी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती (BJP News) करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT