Congress Vs BJP  File Photo
राष्ट्रीय

BJP vs Congress | भाजपच्या ४४ आमदार, खासदारांवर बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे आरोप, काँग्रेसचा दावा 

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजपचे ४४ आमदार, खासदारांवर बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्याचा दावा काँग्रेसने केला. देशातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या घटनांमधून सत्तेच्या दबावामुळे भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याचा एक ठराविक पॅटर्न दिसून येतो, असेही काँग्रेसने म्हटले.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना गोव्यातील एका प्रकरणाचा उल्लेख त्या म्हणाल्या की, भाजपशी संबंधित व्यक्तीच्या मुलावर अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप असून, दीर्घकाळ हा प्रकार दडपण्यात आला. तसेच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर सरकार मौन का बाळगते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लांबा यांनी महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील काही चर्चित प्रकरणांचा उल्लेख करत भाजपवर आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप केला. महिला सुरक्षेबाबत सरकारची भूमिका गंभीर नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात महिलांविरुद्ध गुन्ह्यांची संख्या वाढल्याचा दावा करत सरकारवर टीका करण्यात आली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT