नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्र भाजपच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
या भेटीबाबत रविंद्र चव्हाण यांनी स्वतः सोशल मीडियावरून माहिती दिली. रविंद्र चव्हाण म्हणाले की, प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी 'संघटन पर्व'अंतर्गत महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सदस्यता नोंदणीची माहिती त्यांना दिली. तसेच इतर संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले,' असेही चव्हाण म्हणाले.