'बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, निवडणुका लष्कराच्या उपस्थितीत घ्या...',  File Photo
राष्ट्रीय

'बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, निवडणुका लष्कराच्या उपस्थितीत घ्या...', BJP नेते मिथुन चक्रवर्ती

'बंगाल हातातून निसटत चालला आहे'

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

भाजप नेते आणि चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती म्‍हणाले, आम्‍हाला राज्‍यात दंगे नको आहेत. बंगालमध्ये चांगली स्‍थिती नाही. दंगल प्रभावीत क्षेत्रातील हिंदुंना आपली घरे सोडावी लागत आहेत. बंगालमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे. बंगाल आपल्या हातातून निसटत चालला आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद हिंसेनंतर या ठिकाणी राजकारणाला उत आला आहे. भाजप नेते आणि ज्‍येष्‍ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी हिंसेवर मोठे वक्‍तव्य केले आहे. त्‍यांनी म्‍हंटलंय की, मी केंद्रीय गृह मंत्र्यांना अपिल करतो की, त्‍यांनी बंगालमध्ये राष्‍ट्रपती शासन लागू करावे. तसेच बंगालमध्ये पुढच्या निवडणुका या सैन्याच्या उपस्‍थितीत करण्यात याव्यात. आम्‍हाला बंगालमध्ये निष्‍पक्ष निवडणूका हव्या आहेत असे ते म्‍हणाले. आम्‍हाला राज्‍यात दंगे नको आहेत. बंगालमध्ये सध्या दु:खद स्‍थिती आहे. दंगा प्रभावित क्षेत्रात हिंदूंना आपली घरे सोडून जावी लागत आहेत.

वक्‍फ संशोशन कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये ११ एप्रिल रोजी मोठी हिंसा झाली होती. मुस्‍लिम बहुल मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्‍ह्यासह दक्षिण २४ परगनाच्या भांगोर मध्ये हिंसेच्या घटनेनंतर तणाव वाढला. या हिंसाचारात तीन लोक मारले गेले होते. तर २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. यानंतर या परिसरात अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात आले आहे.

बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले

बंगालमध्ये २०२६ रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या आधीच हिंसेंने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये आरोप-पत्‍यारोपांच्या फैरी झडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी आपआपल्‍या मतदारांना आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्‍न सुरू झाले आहेत. राज्‍यात मुस्‍लिमांची मोठी संख्या आहे.

११ एप्रिलला सर्वप्रथम मुर्शिदाबादच्या शमशेरगंज ब्‍लॉकच्या धूलियान मध्ये हिंसेची ठिणगी पडली होती. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्‍या होत्‍या. जवळच्या सूती परिसरातही जाळपोळीच्या घटना घडल्‍या होत्‍या. या ठिकाणी एजाज अहमद नावाच्या व्यक्‍तीचा गोळी लागून मृत्‍यू झाला होता. येथून काही किमी अंतरावरच्या शमशेजगंजमध्ये ७० वर्षीय हरगोबिंदो दास आणि त्‍यांचा ४० वर्षीय मुलगा चंदन यांची घरात घुसून हत्‍या करण्यात आली होती.

राज्‍यपाल म्‍हणाले....

पश्चिम बंगालचे राज्‍यपाल सीवी आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्‍त्र सोडले. त्‍यांनी आरोप केला की, राज्‍यात हिंसेचा जसा प्रकोप वाढत आहे. त्‍यावर त्‍यांनी दावा केला की, बंगालमध्ये निवडणुकीच्या आधी नेहमीच हिंसाचार भडकत असतो. कोणताही सभ्‍य समाज अशा वातावरणात राहू शकत नाही.

हिंसेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याआधी केंद्रावर कट रचल्याचा आरोप केला होता. वक्‍फ संशोधनावर तुम्‍ही इतकी घाई का केली? गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्‍यांनी टीका केली. जेंव्हा मोदी नसतील तेंव्हा तुमचे काय होईल? मला मोदीजींना सांगायचे आहे तुम्‍ही जरा अमित शहा यांच्यावर लगाम लावा. आमच्या विरूद्ध केंद्रीय संस्‍थांचा वापर करत आहेत. मुर्शिदाबाद हिंसाचारावर बोलताना ममता दिदी यांनी हा एक पूर्वनियोजित धार्मिक दंगा असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.त्‍या म्‍हणाल्‍या, बंगालमध्ये दंगे भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. भाजप बंगालमध्ये खोट्या बातम्‍या पसरवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT