राष्ट्रीय

विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भाजप, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात काही जागांवर होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने सोमवारी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने पंजाबमधील जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शीतल अंगुराल यांना तर पश्चिम बंगालच्या रायगड मतदारसंघातून मानस कुमार घोष यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राणाघाटमधून मनोज कुमार विश्वास, बगदा येथून विनय कुमार विश्वास आणि माणिकताला मतदारसंघातून कल्याण चौबे भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेश व उत्तराखंड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. हमीरपूर मतदारसंघातून डॉ. पुष्पेंद्र वर्मा यांना तर नालागड येथून हार्दिक सिंह बावा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथमधून लखपत भूतोला तर आणि मंगलोर येथून काझी निजामुद्दीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT