Cabinet Reshuffle pudhari
राष्ट्रीय

Cabinet Reshuffle: नितीन गडकरी, राजनाथ सिंहांच्या 'वानप्रस्थाश्रमाची' तयारी... स्मृती इराणींचे होणार कॅबिनेटमध्ये कमबॅक?

Anirudha Sankpal

Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत दिल्लीच्या राजकीय गोटातून मिळत आहे. काही माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार वेगवेगळे दावे केले जात आहेत. यात आता माजी मंत्री स्मृती इराणी यांची देखील पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू धाली आहे. त्यामुळं शक्यतांचा बाजार देखील गरम झाला आहे. यात नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांचा देखील पत्ता कट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

स्मृती इराणी यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांनी यापूर्वी केंद्रीय मानव संसाधन विकार मंत्रालय आणि सूचना प्रसारण मंत्रालयन देखील सांभाळलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे टेक्सटाईल, महिला आणि बालकल्याण आणि अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय देखील होते. आता त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

पराभवानंतर राजकारणापासून दूर

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभवाचा झटका बसल्यानंतर त्या केंद्रीय राजकारणातून बाहेर पडल्या होत्या. मात्र आता त्यांना स्मृती इराणी यांना पुन्हा केंद्रीय मंत्रीमंडळात येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्मृती इराणी यांना कॅबिनेटमध्ये सामील करून भाजप त्यांना २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा अमेठीच्या मैदानातून उतरवू शकतात. २०२४ मध्ये काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी इराणींना मात दिली होती.

अनुराग ठाकूर यांचीही वापसी

स्मृती इराणींच्या बरोबरच कॅबिनटेच्या फेरबदलात अनुराग ठाकूर यांना देखील लॉटरी लागू शकते. भाजप हिमाचल प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान देऊ शकते. उत्तर प्रदेशात ब्राम्हण चेहरा म्हणून जतिन प्रसाद यांना देखील कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. ते अमित शहा यांचे जवळचे मानले जातात. आगामी कॅबिनेट फेरबदलात अमित शहा यांचा वरचष्मा असण्याची दाट शक्यता आहे.

नितीन गडकरी, राजनाथ सिंहांची पत्ता कट?

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा कॅबिनेटमधून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या नेत्यांना इतर ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. भाजपकडून अजून याबाबत अधिकृत कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT