भारतीय जनता पक्षाने विविध राज्यांसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक केली आहे. Twitter
राष्ट्रीय

BJP In-Charge : भाजपकडून प्रभारींची नेमणूक, विनोद तावडेंकडे बिहार; तर जावडेकरांकडे केरळची जबाबदारी

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : BJP In-Charge : भारतीय जनता पक्षाने विविध राज्यांसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही मात्र महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्याकडे बिहार, प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळ, डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर या राज्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा संघटनेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

पुढील काही महिन्यात महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये भाजपने यापूर्वीच निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी जाहीर केले आहेत. यानुसार महाराष्ट्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव तर सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहेत.

कोणत्या राज्याची कोणाकडे जबाबदारी?

  • अंदमान आणि निकोबार, प्रभारी- रघुनाथ कुलकर्णी

  • अरुणाचल प्रदेश, प्रभारी- अशोक सिंघल

  • बिहार, प्रभारी- विनोद तावडे, सहप्रभारी- दीपक प्रकाश

  • छत्तीसगड, प्रभारी- नितीन नवीन

  • दादरा नगर हवेली, प्रभारी- दुष्यंत पटेल

  • गोवा, प्रभारी- आशिष सुद

  • हरियाणा, प्रभारी- सतीश पुनिया, सहप्रभारी- सुरेंद्रसिंह नागर

  • हिमाचल प्रदेश, प्रभारी- श्रीकांत शर्मा, सहप्रभारी- संजय टंडन

  • जम्मू काश्मीर, प्रभारी- तरुण चूघ, सहप्रभारी- आशिष सुद

  • झारखंड, प्रभारी- लक्ष्मीकांत वाजपेयी

  • कर्नाटक, प्रभारी- राधा मोहनदास अग्रवाल, सहप्रभारी- सुधाकर रेड्डी

  • केरळ, प्रभारी- प्रकाश जावडेकर, सहप्रभारी- अपराजिता सारंगी

  • मध्यप्रदेश, प्रभारी- डॉ. महेंद्रसिंह, सहप्रभारी- सतीश उपाध्याय

  • मणिपूर, प्रभारी- डॉ. अजित गोपछडे

  • मेघालय, प्रभारी- अनिल अँटनी

  • मिझोरम, प्रभारी- देवेश कुमार

  • नागालँड, प्रभारी- अनिल अँटनी,

  • ओडिशा, प्रभारी- विजयपाल सिंह तोमर, सहप्रभारी- लता उसेंडी

  • पाँडिचेरी, प्रभारी- निर्मल कुमार सुराणा

  • पंजाब, प्रभारी- विजयभाई रूपानी, सहप्रभारी- नरेंद्र सिंह

  • सिक्कीम, प्रभारी- दिलीप जयस्वाल

  • उत्तराखंड, प्रभारी- दुष्यंतकुमार गौतम, सहप्रभारी- रेखा वर्मा

  • उत्तर पूर्वेकडील राज्य, संयोजक- डॉ. संबित पात्रा, सहसंयोजक- व्ही. मुरलीधरण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT