राष्ट्रीय

आंध्रात ४ टक्के मुस्लिम आरक्षण देणार : चंद्राबाबू नायडूंचा पुनरुच्चार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डस्‍क : सुरुवातीपासूनच आम्ही मुस्लिमांसाठी चार टक्के आरक्षणाला पाठिंबा देत आहोत आणि ते सुरूच राहील, असे स्‍पष्‍ट करत आंध्र प्रदेशमध्‍ये मुस्लिम समाजाला चार टक्के आरक्षण देणार, या भूमिकेचा तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज (दि. ५ मे) पुनरुच्चार केला.

गेल्या आठवड्यात चंद्राबाबू नायडू यांनी असेही सांगितले होते की, राज्यात एनडीएची सत्ता आल्यानंतर लवकरच हज यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. यानंतर त्‍यांनी पुन्‍हा एकदा मुस्‍लिम आरक्षणाचा पुनरुच्‍चार केला आहे. दरम्‍यान, तेलंगणातील झहीराबाद येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्माच्या आधारे मुस्लिमांना दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोटा देऊ देणार नाही, असे म्‍हटले होते. यानंतर काही दिवसांनी चंद्राबाबू नायडू यांनी मुस्‍लिम आरक्षणाचा पुनरुच्‍चार केला आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी हा मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी YSRCP विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये स्थापन झालेल्या NDA युतीचा एक भाग आहे. अभिनेता-राजकारणी पवन कल्याण यांची जनसेना हा देखील एनडीए आघाडीचा पक्ष आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT