डॉ. बाबासाहेब आंबेडकर  File Photo
राष्ट्रीय

काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान, भाजपचा आरोप

BJP Blames Congress| भाजप संबंधित पत्र प्रकाशित करणार

निलेश पोतदार

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचा अपमान काँग्रेसने केल्याचा आरोप करत काँग्रेसने जनतेची माफी मागावी, असे भाजपने म्हटले आहे. तसेच काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेले पत्र भाजपतर्फे देशभर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही भाजपने म्हटले आहे.

भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाचा काही भाग दाखवून राजकीय मुद्दा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र देशातील जनतेला काँग्रेसचा हा हेतू चांगलाच माहिती आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना पद्मश्री किंवा पद्मविभूषण दिला नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करणारे काजरोळकर यांना १९७० मध्ये पद्मभूषण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. जवाहरलाल नेहरूसुद्धा आंबेडकरांच्या विरोधात प्रचार करायला गेले होते. आज काँग्रेस देशभर नाटक करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे सदस्य होऊ दिले नाही. त्यांना कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसने त्यांना भारतरत्नही दिला नाही. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचे एकही स्मारक उभारू दिले नाही, असेही ते म्हणाले.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या राजीनाम्याची प्रतही आमच्याकडे आहे. या राजीनाम्यात डॉ. आंबेडकरांनी नेहरूंवर आरोप केले आहेत आणि लिहिले आहे की मी सर्वात पात्र होतो, मात्र मला एकही योग्य विभाग दिला गेला नाही. त्यांचा संसदीय समितीत समावेश नव्हता. त्यांना कायदा मंत्रालयात कामही करू दिले नाही. अनुसुचित जाती- अनुसुचित जमातीला योग्य संरक्षण दिले जात नसल्याचेही ते म्हणाले होते. फक्त मुस्लिमांनाच सर्व सुविधा देण्यात आल्या. डॉ.आंबेडकरांचे राजीनाम्याचे पत्र जनतेसमोर का येऊ दिले नाही, याचा खुलासा काँग्रेसने करावा, असे आव्हानही त्यांनी काँग्रेसने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT