ठकसेन बिंगसन जॉन  
राष्ट्रीय

Bingson John | चार्ल्स शोभराजची कॉपी ! तिनशे 5 स्टार हॉटेल्सना लुटणाऱ्या ठकसेनाचे अनेक कारनामे उघड, तब्बल ३६ वर्षे सुरु होता खेळ!

रायपूर पोलिसांनी गुरुवारी केली होती अटक, हायफ्राफाईल चोरट्यांची हाय क्लास फसवणूक : इंग्रजीत बोलणे, राहणे खाणे व बील न भरताच हॉटेलमधील मौल्यवान वस्तू वर डल्ला मारणे

Namdev Gharal

Bingson John चार्ल शोभराज नामक आंतरारष्ट्रीय गुन्हेगाराने एकवेळ जगभरात धुमाकूळ घातला होता. तो अत्यंत धूर्त, हुशार आणि रूप बदलण्यात पटाईत होता. पोलिसांना चकमा देणे, तुरुंगातून पळून जाणे इत्‍यादी गोष्टी तो लिलया पार पाडत. अनेक हत्‍या त्‍याने केल्या, त्याचे वडील भारतीय (सिंधी) आणि आई व्हिएतनामी होती. तो मोस्ट वॉटेंड आंतराष्ट्रीय क्रिमीनल होता. आता त्‍याच कित्ता गिरवत तामिनाडूतील विंगसन जॉन नामक ठकसेनाने अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्सची लूट केली आहे. त्‍यांना कोणाचा खून केलेला नाही पण मोठ्या हॉटेल्सना फसवून पळून जाण्यात त्‍याचा हातखंडा होता. गेले ३६ वर्षे तो हे काम लिलया करत होता. काल रायपूर पोलिसांनी त्‍याला अटक केली. यानंतर त्‍याने केलेले कारनामे उघड होत आहेत.

३०० हून अधिक हॉटेल्सना लावला आहे चूना

देशातील तब्बल ३०० हून अधिक आलिशान पंचतारांकित हॉटेल्सना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाचा प्रराक्रम विंगसन जॉन याने केला आहे. रायपूर पोलिसांनी आता त्‍याला अटक केली आहे. त्‍याने इतर देशातील हॉटेल्सनाही गंडा घातला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

उच्चभ्रू राहणीमान अन् इंग्रजीतून संभाषण

बिंगसन जॉन हा सर्वसामान्य चोरांसारखा नव्हता. त्याची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत हायप्रोफाईल होती. कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश करताना तो आपली खोटी ओळख सांगायचा. कधी तो परदेशी टूर गाईड बनायचा, तर कधी इंग्रजीचा शिक्षक किंवा योग प्रशिक्षक असल्याचे भासवायचा. गेल्या ३६ वर्षांपासून त्याचा हा मुख्य धंदा होता. रायपूर येथील पंचतारांकित हॉटेल प्रशासनाच्या तक्रारीवरून त्याचा तपास सुरू होता.

त्याचे इंग्रजी भाषेवरील उत्कृष्ट प्रभुत्व, बोलण्याची ढब आणि उच्चभ्रू राहणीमान पाहून हॉटेलचे कर्मचारी आणि व्यवस्थापन पुरते प्रभावित व्हायचे. त्याच्या या रुबाबापुढे भल्याभल्यांचा विश्वास बसायचा, ज्यामुळे हॉटेल प्रशासन त्याच्याकडे ॲडव्हान्स मागण्याची हिंमतही करत नसत.

मोफत मौजमजा आणि मौल्यवान वस्तूंची चोरी

हॉटेलमध्ये विना अडचण प्रवेश मिळाल्यानंतर जॉन तिथल्या सर्व उच्च दर्जाच्या आणि महागड्या सेवासुविधांचा मोफत लाभ घ्यायचा. काही दिवस तिथे राहून ऐषोआराम केल्यानंतर, बिल भरण्याची वेळ येण्यापूर्वीच तो अचानक गायब व्हायचा. केवळ बिल बुडवणे एवढ्यापुरताच त्याचा गुन्हा मर्यादित नव्हता, तर जाताना तो हॉटेलमधील महागड्या वस्तू, लॅपटॉप यावरही डल्ला मारायचा. हे कारनामे आता उघड होत असून, पोलिस त्‍याने चोरलेला वस्तूंचा तपास लावत आहेत.

रायपूरमधील 'त्या' एका चुकीमुळे लागला छडा

गेली ३६ वर्षे देशातील विविध राज्यांमध्ये हा लुटमारीचा धंदा राजरोसपणे सुरू होता. मात्र, रायपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेली चोरी त्याला महागात पडली. रायपूरच्या हॉटेलमध्ये दोन दिवस राहून जॉनने ६३,७५५ रुपयांचे बिल तर बुडवलेच, शिवाय हॉटेल प्रशासनाकडून कामासाठी म्हणून घेतलेला १ लाख ४८ हजार रुपयांचा महागडा लॅपटॉपही चोरून तो पसार झाला.

याप्रकरणी हॉटेल प्रशासनाने रायपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सायबर युनिटकडे सोपवण्यात आला. सायबर युनिटने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे विंगसन जॉनचा माग काढत थेट भुवनेश्वर गाठले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT