Bilibili App Global Launch pudhari
राष्ट्रीय

Bilibili App Global Launch: हे Bilibili प्रकरण काय आहे... नुकतेच ग्लोबली लाँच झालं मात्र भारतात डाऊनलोड करणं आहे का सुरक्षित?

Anirudha Sankpal

Bilibili App Global Launch: जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस आणि नेटफ्लिक्स सारखे प्लॅटफॉर्म्स वापरत असाल तर तुम्ही कदाचित Bilibili हे नाव ऐकलं असेल. चीनमधून सुरू झालेला हा प्लॅटफॉर्म आता फक्त एक विदेशी वेबसाईट राहिलेली नाही. ही व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीमिंग, गेमिंग, क्रिएटर कंटेट आणि ऑनलाईन कम्युनिटीचा एक मोठा प्लॅटफॉर्म झाला आहे. नुकतेच हा प्लॅटफॉर्म ग्लोबली लाँच झाला आहे.

मात्र Bilibili अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर का दिसत नाही असा प्रश्न अनेक भारतीयांना पडला आहे. हा प्लॅटफॉर्मचा वापर करणं सुरक्षित आहे का? या प्लॅटफॉर्मवरून काय मिळणार असे अनेक प्रश्न Bilibili बाबत कुतूहल असलेल्या लोकांना पडले आहेत.

काय आहे Bilibili?

Bilibili ची सुरूवात ही जून २००९ मध्ये एनीमे, कॉमिक्स आणि गेम्स कम्युनिटीला टार्गेट करत तयार करण्यात आले होते. जानेवारी २०१० मध्ये याला Bilibili हे अधिकृत नाव देण्यात आले. कालानुरूप हा प्लॅटफॉर्म एका मोठ्या व्हिडिओ आणि एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित झाला. जिथं एनीमे शिवाय गेमिंग, टेक्नॉलॉजी, म्युजिक, लाईफस्टाईल, ज्ञान आणि फॅशनसह इतर श्रेणीतील कंटेट देखील मिळतो.

चीनमध्ये Bilibili ला नेहमी बी साईट अशा नावानं ओळखलं जातं. याची विशेष ओळख म्हणजे व्हिडिओच्यावर दिसणाऱ्या रिअल टाईम कमेंट्स. ज्याला बुलेट कमेंट देखील म्हटले जाते. हे फिचर जास्त इंटरॅक्टिव्ह आणि कम्युनिटी बेस्ट तयार करण्यात आले आहे.

बिलबिलीचे आंतरराष्ट्रीय व्हर्जनमध्ये एनीमे आणि क्रिएटर कंटेटवर जास्त फोकस करण्यात आला आहे. असं असलं तरी प्रत्येक देशाचा कंटेट एकसारखा नाहीये. वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळा कंटेट इथं पहायला मिळतो.

यूट्यूबशी कशी आहे तुलना?

पहिल्यांदा बिलबिली हा एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म वाटू शकतो. मात्र इथं कम्युनिटी आणि व्हिडिओ पाहण्याची पद्धत वेगळी आहे. युट्यूबमध्ये कमेंट खाली दिसतात मात्र Bilibili चा Danmu सिस्टममध्ये कमेंट व्हिडिओच्या वर रिअलटाईम दिसतात. वापरकर्त्यांना आपण व्हिडिओ एकटे नाही तर दुसऱ्या लोकांच्या सोबत पाहात आहोत असं भासतं. आता तर या प्लॅटफॉर्मवरी कंटेटं वाढला आहे.

भारतात का दिसत नाही अॅप?

bilibliliचे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म सर्व देशांमध्ये समान पद्धतीने उपलब्ध नाहीये. बिबली आंतरराष्ट्रीय वेबसाईटने सांगितलं की ग्रेटर चीनच्या बाहेर या अॅपची उपलब्धता इंडोनेशिया, फिलिपीन्स, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर आणि मलेशिया या ठिकाणी ते उपलब्ध आहेत. भारतात या अॅपची उपलब्धताना मर्यादित किंवा वेगळी असू शकतो.

बिलबिलीवर भारतात बंदी आणली जाईलच असं काही नाही. अनेकवेळा एखाद्या देशात गुगल प्ले स्टोअवर अॅप न दिसण्याचा संबंध हा डेव्हलपरच्या भौगोलिक उपलब्धतेच्या सेटिंगवर असते. तसेच लायसन्स किंवा कंटेट डिस्ट्रिब्युशनमुळे देखील असं असू शकतं.

Bilibili वापरणे सुरक्षित आहे का?

Bilibili हे एक ग्लोबल व्हिडिओ आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे आणि ते स्वतःहून कोणतेही मालवेअर (मालिशिअस) ॲप नाही. याचे आंतरराष्ट्रीय ॲप Google Play Store वर देखील उपलब्ध आहे. Google Play च्या 'डेटा सेफ्टी' माहितीनुसार, या ॲपमध्ये डेटा ट्रान्झिट दरम्यान एन्क्रिप्शन आणि डेटा डिलीट करण्याची विनंती करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

तथापि, इतर कोणत्याही सोशल मीडिया किंवा व्हिडिओ प्लॅटफॉर्मप्रमाणेच, Bilibili च्या बाबतीतही प्रायव्हसी आणि डेटा शेअरिंगबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. Google Play च्या डेटा सेफ्टी माहितीमध्ये वैयक्तिक माहिती, ॲप ॲक्टिव्हिटी आणि इतर डेटा स्टोअर किंवा थर्ड पार्टीसोबत शेअर केला जाण्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा की, हे ॲप वापरण्यापूर्वी त्याच्या परवानग्या (Permissions) आणि प्रायव्हसी पॉलिसी नक्की तपासून पाहाव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT