पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड नक्षलमुक्त करण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दल सतत प्रयत्न करत आहेत. राज्याच्या विविध भागात नक्षलवाद्यांशी सतत चकमकी सुरू आहेत आणि त्यांचा खात्मा केला जात आहे. त्याचवेळी, नक्षलवादी आता मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करत आहेत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक उलांडन यॉर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या सहा नक्षलवाद्यांवर एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५,००० रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे. असे वृत्त 'आकाशवाणी'ने दिले आहे.