पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवले असून, दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण ३० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. यादरम्यान जंगलामध्ये शोधमोहीम राबवताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीमध्ये एका सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आहे.
त्याचबरोबर, त्याचबरोबर, कांकेर जिल्ह्यातही आणखी एका कारवाईत सुरक्षा दलांनी 4 नक्षलवाद्यांना ठार मारले. ही कारवाई देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या चकमकींमध्ये सुरक्षा दलांचे जवान सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या यशस्वी कारवाईनंतर सुरक्षा दलांनी परिसरात नक्षलविरोधी मोहिमा अधिक तीव्र केल्या असून, जंगलामध्ये शोधमोहीम सुरूच आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने ही मोठी कारवाई मानली जात असून, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागांत सुरक्षा दलांच्या धडक मोहिमा सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चकमकीच्या ठिकाणाहून २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक सैनिक शहीद झाला आहे. चकमकीनंतर शोध मोहीम सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील वनक्षेत्र असलेल्या गंगलूर पोलिस स्टेशन परिसरातील तोडका आंद्री जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संयुक्त चकमक झाली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांना मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.